[Chaudhary and Company]

services:gst

नाथशक्तिपीठाची आधारशीला अवघ्या ब्रह्मांडाच संचालन , नियंत्रण करणारे वेद ही आहेत. अध्यात्मयोग महर्षि नाथशक्तिपीठाधीश प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांनी नाथशक्तिपीठाची स्थापना करतांना वेद प्रसार व प्रचास कार्यास उद्दिष्टांमध्ये अग्रक्रम दिला आहे. तेव्हा नाथशक्तिपीठाद्वारे संचालित करण्यात येणारी प्रह्लादाश्रम वेदपाठशाळा उत्तम रितीने संचालित करण्यासाठी तसेच नाथशक्तीपीठाचे कामकाज सुव्यवस्थित चालण्यासाठी पुढील ठराव पारित करण्यात आलेत।

१)सध्याच्या स्थितीत जुन्या इमारतीत पावसाळ्यात आत पाणी भरते। ते मुख्यत्वे करून काकांच्या खोलीतील स्नानगृहाच्या निस्सारण व्यवस्थेतून भरते। त्यामुळे प.पू. काकांच्या निवास व्यवस्थेतील स्नानगृह-शौचालय बंद करून बाहेरील जमीन लेव्हल ला स्नानगृह-शौचालय निर्माण करावे अन तेथे जाण्याकरिता अंतर्गत लिफ्टची व्यवस्था उभारणे. अंदाजे खर्च १ लक्ष।

२) नाथशक्तिपीठ प्रसार प्रचार कार्यासाठी मानधन देय व्यक्तीची नेमणूक करणे. त्याने पूर्वनियोजित पद्धतीने समाजामध्ये नाथ शक्ती पिठाची माहिती सातत्याने प्रसूत करत राहावी जेणे करून अश्या कार्यात ओढा असलेल्या अनेक लोकांना जोडता येईल। अंदाजे खर्च ६००० प्रति माह।

३) प्रत्येक उत्सवाचे आर्थिक नियोजन संस्थेने उत्सवाच्या आधी करणे. व उत्सव झाल्यावर लगेचच त्या संबंधीचे हिशेब पूर्ण करून सर्वांसमोर ठेवणे।

४) नाथशक्तिपीठाचे बॅक ऑफिस आणि/ श्रीकांतशास्त्री यांचे ऑफिस वेगवेगळे असावेत, शक्यतोवर नाथशक्तीपीठाचे बॅक ऑफिस हे नवीन बिल्डिंग मध्ये असावे।

५) भांडी ठेवण्यासाठी नवीन बिल्डिंग मध्ये लोखंडी रॅक तयार करावी. तसेच तळघरातील पाणी गळती वर कायम स्वरूपी मार्ग काढावा। अंदाजे खर्च ७५ हजार।

६) नवीन बिल्डिंग मधील तळ मजला (ग्राउंड) मुंज वैगरे साठी आपले कार्यक्रम नसतील त्यावेळी भाड्याने देणे चालू करावे ज्या योगे उतपन्नात वाढ होईल।

७) विद्यार्थ्यांसाठी वैदिक -याज्ञिकी आणि शालेय शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देणे. ह्या साठी सहामाही- त्रैमासिक- साप्ताहिक- दैनंदिन असे दोन्ही अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यात यावे व ह्याच नियोजनावर आधारित शिक्षण देण्यात यावे।

८) प.पु. काकांनी ह्या आधी अनेकदा म्हटले आहे की विदयार्थी जो पर्यंत जुन्या बिल्डिंगमध्ये शिकत आहेत तो पर्यत त्यांची शैक्षणिक प्रगती ही उत्तम राहील। त्यांच्या ह्या विधानाला अनुसरून विद्यार्थ्यांच्या दोन्ही शाखेचे शिक्षण हे जुन्या इमारतीतून देण्यात यावे। शालेय अभ्यासाठी जुन्या इमारतीत हॉल मध्ये एक संगणक व प्रोजेक्टर लावून श्री संजय देशपांडे यांची e-learning अभ्यासिका उपयोगात आणावी. विद्यार्थी आसन बैठक व्यवस्था वैदिक तसेच शालेय शिक्षणात दोन्हीकडे जमिनीवर आसन घालून मांडी घालूनच राहील।

९) विद्यार्थ्यांना संगणक विषयाचे शिक्षण फक्त शेवटच्या दोन वर्षात देण्यात यावे।

१०) सद्य स्थितीत श्रीकांत गुरुजी अन रवी गुरुजी ह्यांना मानधन देण्यात येते। ह्यामध्ये प्रामुख्याने त्या दोघांचे कार्य खालील प्रमाणे आहे।

श्रीकांत गुरुजी: विधर्थ्यांना संथा देणे त्यांचे शैक्षणिक मूल्याकन करणे। नाथ शक्ती पिठाचा प्रचार प्रसार करणे। नवीन कार्यक्रमांचे आयोजन करणे। सतत काकांसोबत राहून गावोगावी प्रचार प्रसार ह्या कारणासाठी फिरणे। व रवीगुरुजींच्या कामावर देखरेख करणे।

रविगुरुजी: श्रीकांत गुरुजींच्या अनुपस्थितीत विद्यार्यांना संथा देणे। संथा काढून घेणे। दैनंदिन सर्वसाधारण देखरेख। बांधकाम वा इतर काम ह्यावर देखरेख।

रविगुरुजी व श्रीकांत गुरुजी दोघे मिळून सध्या कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन सांभाळत असतात।

ह्या दोघांव्यतिरिक्त सौ दीप्ती गदाधर ह्यांना देखरेख व काकांची व्यवस्था ह्या कारणाने मानधन देण्यात येत होते।

रवी गुरुजींना १००००, श्रीकांत गुरुजींना १५००० व सौ दिप्तीला १०००० प्रति माह असे मानधन गेल्या १२ वर्षांपासून देण्यात येत आहे। त्याआधी श्रीकांत गुरुजींना मानधन हे उत्पन्नाच्या जवळपास ५०% एव्हढे दिले जात असे।

गेल्या १२ वर्षात ह्या मानधनात कोणतीही वाढ करण्यात आली नाही। परंतु श्रीकांत गुरुजींना बँकेतून कर्ज घ्यावयाचे असल्याने त्यांचे व सौ दीप्ती ह्यांचे मानधन एकत्र करून रु.२५००० श्रीकांत गुरुजींच्या एकट्याच्या नावाने देणे २०१७ पासून चालू झाले।

गेल्या १२ वर्षात मानधनात वाढ जरी झाली नसली तरी घर खर्च सर्वांचेच वाढलेत ह्या कारणाने रवी गुरुजी व श्रीकांत गुरुजी ह्यांना स्वतंत्र यादनिकी करण्याची परवानगी देण्यात आली होती। अर्थातच स्वतःचे आर्थिक नियोजन सांभाळताना ह्या दोन्ही गुरुजींनी थोड्याफार प्रमाणात नाथशक्तीपीठाचे कार्य बाजूला ठेऊन इतर कामे केली ज्याचा परिणाम म्हणून वैदिक शिक्षणाचा दर्जा काही गेल्या काही वर्षांत खालावला ह्याची स्पष्ट कबुली दोन्ही गुरुजींनी दिली आहे।

नाथ शक्ती पिठाचे वैदिक अध्ययन हे एक ध्येय आहे। ह्या साठी वैदिकध्ययन दर्जा सुधारणे गरजेचे आहे।

ओम एज्युकेशन संस्था ही काही फक्त व्यावहारिक निकषांवर कार्य करणारी संस्था नाही। फुल ना फुलाची पाकळी ह्या न्यायाने दोन्ही गुरुजींचे मानधन वाढवून रविगुरुजी २०००० व श्रीकांतगुरुजी ३५००० प्रति माह करावे असे ठरले। ह्या बदल्यात घसरलेला शैक्षणिक दर्जा परत उत्तम करण्यासाठी ह्या दोन्ही अध्यापकांनी जास्त मेहनत घ्यावी व सुव्यवस्थित शिक्षण पद्धती चालू ठेवावी। ह्या पैकी रविगुरुजींचे मानधन प. पु. काकांनी ऑगस्ट २०२२ पासून वाढवलेले आहे व त्यांच्या जवाबदारीत अजून एक वाढ केलेली आहे ती म्हणजे बाहेरगावी अनुष्ठान असेलतर त्यास उपस्थित राहून सहकार्य करणे।

११) वैदिक शिक्षण पूर्वी प्रमाणेच पहाटे ४.३० पासुन सुरू व्हावे व सकाळ संध्याकाळ संध्या वंदन व उपासने व्यतिरिक्त किमान सात तासांपर्यंत याचा कालावधी असावा. तसेच शालेय अभ्यासक्रमासाठी दीड तासांचा कालावधी स्वतंत्र असावा.

१२) वैदिक पाठशाळा अध्यासक्रमाचे नियोजन , संचालन , प्रात्याक्षिक , परीक्षा , मूल्यमापन , आदिंवर वेदपाठशाळा प्रधान आचार्य श्री. श्रीकांतशास्त्री गदाधर यांनी लक्ष द्यावे.

१३) विश्वस्त गुरूबंधु-भगिनी व भाविकांच्या माध्यमातुन उत्पन्न वाढीची योजना कार्यान्वित करतील. त्यासाठी आज काही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही।

१४) पुढे चालुन प्रह्लादाश्रम वेदपाठशाळे साठी शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी पूर्णवेळ पगारी शिक्षकाची नेमणुक करावयाची झाल्यास श्री. श्रीकांत गुरुजी व श्री रविगुरुजी यांचे मानधन कमी केल्या जाऊ शकते. याची स्पष्ट कल्पना त्यांना देण्यात यावी. <unit name=“default”>

Ads Page Id (:combostrap:ads:inarticle2) not found.
Showing the In-article placeholder
१५) रविगुरुजी व श्रीकांत गुरुजी हे आश्रमात निवासी नसल्यामुळे विद्यार्थ्यांवर पूर्णवेळ लक्ष राहत नाही। योग्य वळण लागणे शिस्त लागणे ह्या साठी एकतर कोणत्या जोडप्याची किव्वा पूर्णवेळ वैदिक शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी। सुयोग्य व्यक्ती शोधण्याचे प्रयत्न चालूच आहेत ते अधिक तीव्र करावेत। अंदाजे खर्च पूर्णवेळ शिक्षक असल्यास १५ ते २० हजार प्रति माह। अन जोडपे असल्यास १० हजार प्रति माह।

१६) नाथशक्तिपीठाचे सध्याशी असलेल स्वयंपाक घर , स्नानगृह , शौचालय ही येत्या दोन तीन वर्षात शिकस्त होतील अन्यथा त्यावर वारंवार डागडुजीचा खर्च करावा लागेल. त्याऐवजी त्या पाठीमागे असणार्‍या जागेत RRC मध्ये प्लिंथ घेऊन एकवीटी बांधकाम करून कमीतकमी खर्चात अन तरीही टिकाऊ स्वयंपाक गृह , अध्यापक निवास , केअरटेकर निवास, स्नानगृह व शौचालय ह्यांची व्यवस्था निर्माण करावी. अपेक्षीत खर्च अंदाजे ३० लक्ष

inarticle2

Ads Page Id (:combostrap:ads:inarticle1) not found.
Showing the In-article placeholder